Jobs will be lost and which new ones will be created due to AI?

Jobs will be lost and which new ones will be created due to AI? विषय तसा अतिशय महत्वाचा.

आज आपण ज्या काळात जगतोय, तो काळ Artificial Intelligence (AI) चा आहे. 

पूर्वी फक्त सिनेमांमध्ये दिसणारी बुद्धिमान यंत्रणा आता आपल्या मोबाईल, ऑफिस, बँक, हॉस्पिटल आणि अगदी घरातसुद्धा पोहोचली आहे.

AI मुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे –

AI मुळे नोकऱ्या जाणार का?

आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न –

AI मुळे नवीन संधी निर्माण होणार का?

या ब्लॉगमध्ये आपण या दोन्ही प्रश्नांची सविस्तर आणि वास्तववादी उत्तरे पाहणार आहोत.

AI म्हणजे नेमकं काय?

Artificial Intelligence म्हणजे अशी तंत्रज्ञान प्रणाली जी मानवाप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते आणि निर्णय घेऊ शकते.

उदा.

  • ChatGPT
  • Google Assistant
  • Self-driving cars
  • Face recognition
  • Recommendation systems (Netflix, YouTube)

AI चा उद्देश माणसाची मदत करणे आहे, पण काही ठिकाणी ते माणसाची जागा देखील घेत आहे.

AI मुळे कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत?

सर्व नोकऱ्या AI मुळे जाणार नाहीत. ज्या नोकऱ्या repetitive, नियमांवर आधारित आणि कमी creative आहेत त्या जास्त धोक्यात आहेत.

1️⃣ Data Entry Operator

डेटा टाईप करणे, Excel अपडेट करणे, रिपोर्ट तयार करणे ही कामं AI आणि Automation खूप वेगाने करत आहे. अगदी सेकंदाच्या फरकाने AI आपल्याला डेटा तयार करून देत आहे.

2️⃣ Call Center / Telecalling Jobs

आज Chatbots, Voice Bots आणि AI Assistants ग्राहकांशी थेट संवाद साधत आहेत. आपण एखादी वेबसाईट ओपन केली तर Chat with us पर्यायामध्ये तुम्हाला हे Chatbots पाहायला मिळतील.

3️⃣ Basic Accounting & Billing Jobs

Invoice तयार करणे, GST calculation, basic bookkeeping हे सगळं आता AI software करतं. योग्य प्रॉम्प्ट जर AI पर्यंत पोहोचला तर त्यातून येणारे आउटपुट हे काही वेळा परिपूर्ण मिळाले आहे.

4️⃣ Factory मधील Manual Jobs

Robots आता assembly line, packaging, sorting करत आहेत. मोठमोठ्या मशिन्स चे सॉफ्टवेअर रोबोट प्रमाणे कार्य करत आहेत. त्यामुळे कंपन्यांची मनुष्यबळाची गरज कमी होत चालली आहे.

जिथे १ मशीन चालवायला पूर्वी २ व्यक्ती लागत होत्या तिथे आता १ तांत्रिकी व्यक्ती गरजेचा आहे.

5️⃣ Content Rewriting & Simple Writing Jobs

Basic news rewriting, product descriptions, captions – AI हे काम काही सेकंदात करत आहे.

तुम्ही AI ला अगदी सहज Love U bhava असं जरी म्हणालात तरीही तो आपल्या विचारांना साजेल असे भावनिक उत्तर आपल्याला देत आहे.

म्हणजे AI सगळ्यांच्या नोकऱ्या काढून टाकेल का?

:- या प्रश्नच सरळ उत्तर ❌ नाही!

AI नोकऱ्या नष्ट करत नाही, तर नोकऱ्यांचं स्वरूप बदलतो.

इतिहास पाहिला तर –

संगणक आला → Typist jobs कमी झाले
Internet आला → नवीन IT jobs तयार झाले

तसंच AI सुद्धा नवीन करिअर संधी निर्माण करत आहे. गरज आहे ती आपल्याला डिजिटल स्वरूपातील ज्ञान आकलन करण्याची. डिजिटली सक्षम होण्याची.

AI मुळे कोणत्या नवीन नोकऱ्या तयार होत आहेत?

आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे 👇

1️⃣ AI Prompt Engineer

AI कडून योग्य उत्तर मिळवण्यासाठी योग्य प्रश्न (prompt) देणं ही एक नवी skill आहे.

👉 कोणासाठी योग्य?

Content Writers, Marketers, Students, All Digital Content Creators

2️⃣ AI Content Creator

AI वापरून:

  • Blogs
  • YouTube scripts
  • Reels ideas

Ads copy तयार करणारे creators आज खूप मागणीत आहेत. 

3️⃣ Data Analyst & Data Scientist

AI ला शिकवण्यासाठी आणि निर्णयासाठी डेटा लागतो. त्यामुळे तुमच्यासाठी Data Analyst म्हणून करिअर चा नवीन पर्याय उपलब्ध आहे.

👉 Important Skills:

Excel
SQL
Python
Power BI / Tableau

4️⃣ AI Trainer / AI Supervisor

AI च्या output वर नजर ठेवणं, चुका दुरुस्त करणं, language improve करणं. AI चा वापर करून आपण टप्प्याटप्याने अभ्यासक्रम तयार करू शकतो.

इतकेच नाही तर Artificial Intelligence मधील भाषांतराचे विश्लेषण, वेगवेगळे प्रॉम्प्टस तयार करणे आणि प्रसारित करणे अश्या अनेक नवीन कला उदयास येऊ लागल्या आहेत.

5️⃣ Cyber Security Expert

AI मुळे cyber attacks सुध्दा वाढत आहेत, त्यामुळे सुरक्षा तज्ञांची गरज वाढतेय. तुम्ही Cyber Security चा अभ्यास करून हे जॉब्स सहज करू शकता. 

डिजिटल प्लॅटफॉर्म्स जितके जलद प्रगती करत आहेत तितकेच भविष्यातील तंत्रज्ञानातील सुरक्षेचा धोका वाढत आहे. त्यासाठी Cyber Security Experts ची गरज देखील वाढली आहे.

6️⃣ Digital Marketing + AI Expert

AI tools वापरून:

  • Ads optimize करणं
    SEO analysis
  • Social media automation

Digital Marketers साठी ही सुवर्णसंधी आहे. ह्या आधी तुम्हाला मार्केटिंग साठी दारोदारी पायपीट करावी लागत होती.

तेच आता एका बंद खोलीत बसून सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसायाचे ब्रँड चे मार्केटिंग अगदी सहज करू शकता. Artificial Intelligence हे तंत्रज्ञान आपल्याला सहज आणि हवी तशी मदत करू शकते.

7️⃣ AI आधारित Freelancing & Online Business

  • AI blog websites
    AI tools consulting
  • AI automation services


वरील सर्व पर्याय कमी खार्चिक आणि वेळ वाचवणारे आहेत. AI Blog Website मध्ये तुम्ही Automation चा वापर करू शकता. 

जेणेकरून तुमचा ब्लॉग लिहिण्याचा वेळ वाचेल आणि AI स्वतः तुमच्यासाठी लेखन काम करेल.

कोणत्या नोकऱ्या कधीच जाणार नाहीत?

AI कितीही प्रगत झालं तरी काही नोकऱ्यांना मानवी भावना, निर्णयशक्ती आणि creativity लागते.

✔️ Teacher
✔️ Doctor (As an AI assistant)
✔️ Psychologist
✔️ Lawyer (As an AI support)
✔️ Entrepreneur
✔️ Creative Artist
✔️ Digital Marketer

AI च्या युगात टिकायचं असेल तर काय करायला हवं?

✔️ 1. Skills Upgrade करा

  • AI Tools शिकणे
  • Digital skills
  • Data & Analytics 

✔️ 2. AI ला शत्रू नाही, मित्र बनवा

AI वापरून तुमचं काम जलद आणि स्मार्ट कसं होईल हे शिका.

✔️ 3. One Skill + AI = Career Security

उदा.

  • Content Writing + AI
  • Accounting + AI
  • Marketing + AI 


✔️ 4. Lifelong Learning स्वीकारा

AI रोज बदलतोय, त्यामुळे शिकणं कधीच थांबवू नका.

अनेक सूत्रांनी भविष्यातील जॉब धोक्यात असल्याचे भाकीत वर्तवले आहेत. पण तसे काहीच नसून अगदी नव्याने संधी चालून येणार आहेत.

फक्त योग्य वेळेस संधी ओळखून स्वतःला प्रगत तंत्रज्ञान अवगत करून कसे जलद काम करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

1 thought on “Jobs will be lost and which new ones will be created due to AI?”

  1. Pingback: Can AI Become Smarter Than Humans - Truth and Myth

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top