1 March 2026 New Rules in India – LPG Price, Bank Charges, Sim Binding, Railway Tickets

दर महिन्याच्या सुरुवातीला कायदेशीर वा सामाजिक नियमावलीत बदल होत असतात. 1 March 2026 New Rules in India – LPG Price, Bank Charges, Sim Binding, Railway Tickets या ब्लॉग मध्ये आपण १ मार्च २०२६ पासून होणारे कायदेशीर बदल, याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

SIM Binding: सिम बाइंडिंगचा नवा नियम

आतापर्यंत हा पर्याय तुमच्या Digital Payments संबंधित अप्लिकेशन पुरता मर्यादित होता. पण आता तुमचे सोसिअल मीडिया Applications सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

थोडक्यात काय तर WhatsApp, Telegram सारखे मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी होणारे सोसिअल मीडिया ऍप्लिकेशन्स, जर तुम्ही मोबाईल मधून प्रत्यक्ष सिम बाहेर काढले तर बंद होणार आहेत.

जोपर्यंत मोबाईल डिवाइस मध्ये सिम प्रत्यक्ष उपलब्ध आहे तोपर्यंत या ऍप्लिकेशन्स च्या सेवा सुरु राहणार आहेत.

इतकेच नाही तर जरी तुमचा मोबाईल डिवाइस अन्य कोणत्याही नेटवर्क म्हणजे WiFi किंवा Hotspot ला कनेक्ट असेल तरीही सिम कार्ड असल्याशिवाय हे ऍप्लिकेशन्स तुम्हाला वापरता येणार नाही.

SIM Binding करण्यामागे मुख्य हेतू म्हणजे Cyber Security असे सांगण्यात आले आहे.

UPI Advance Security

आतापर्यंत आपण UPI द्वारे सहज कितीही रक्कम एका पिन द्वारे कोणालाही पाठवत होतो. पण १ मार्च २०२६ पासून मोठ्या डिजिटल आर्थिक व्यवहारांसाठी Security चे आणखी दोन टप्पे पार करावे लागणार आहेत.

जसे की, ह्या आधी १ पिन वापरून काम होत होते, पण इथून पुढे १ पिन, Biometric Verification किंवा Multi Factor Authentication चे पर्याय देखील वापरावे लागू शकतात.

हल्ली सायबर हल्ल्याचे प्रमाण खूप वाढले आहे या दृष्टीने येणाऱ्या काळात हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.

Bank Account Minimum Balance Penalty

ह्या आधी आपल्याकडे ठरविक काळापर्यंत शिल्लक रक्कम मर्यादेपेक्षा कमी असेल तरच दंड आकारला जात होता.

पण १ मार्च २०२६ पासून बदललेल्या नियमांनुसार सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance) या आधारे दंड आकारला जाणार आहे.

या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या बँक खाते असलेल्या शाखेला लवकरात लवकर भेट द्या.

LPG Prices

दर महिन्याच्या १ तारखेला आपण LPG cylinder च्या किमतींमध्ये चढ उत्तर पाहत असतो, पण गेल्या काही महिन्यात घरगुती Gas Cylinder च्या किमती स्थिर आहेत त्यामुळे या मध्ये १ मार्च पासून बदल होऊ शकतात.

अधिक माहितीसाठी तुमच्या service provider सोबत नक्की संपर्क करा.

Railway Ticket Booking

आतापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून जारी केलेल्या UTS मोबाईल अप्लिकेशन मधून आपण सहज घरबसल्या रेल्वे तिकीट बुक करू शकत होतो.

पण इथून पुढे या कामासाठी आपल्याला RailOne हे मोबाईल अप्लिकेशन प्लेस्टोर वर उपलब्ध आहे.

या अप्लिकेशन चा इंटरफेस जारी बदललेला असेल तरी आवश्यक टिकिट्स बुकिंग साठी उत्तम पर्याय आहे.

Important Tenancy Rules

१ मार्च २०२६ पासून भाडेकरुंसाठीचे देखील नियम बदलले आहेत. Security Deposit ची रक्कम जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या भाड्यापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.

तसेच घरमालकाला खोली तपासायची असल्यास २४ तास आधी भाडेकरू ला कळवणे बंधनकारक कार्यांत आले आहे.

❓ FAQ – 1 March 2026 New Rules in India

SIM Binding म्हणजे मोबाईल क्रमांकाशी संबंधित ऍप्लिकेशन वापरण्यासाठी मोबाईलमध्ये प्रत्यक्ष SIM कार्ड असणे आवश्यक असणे. १ मार्च २०२६ पासून WhatsApp आणि Telegram सारखी अ‍ॅप्स SIM शिवाय वापरता येणार नाहीत.
नाही. जरी मोबाईल WiFi किंवा Hotspot ला कनेक्ट असला तरी SIM कार्ड डिव्हाइस मध्ये प्रत्यक्ष उपलब्ध नसल्यास अ‍ॅप्स सेवा बंद होऊ शकते.
मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी आता अतिरिक्त सुरक्षा टप्पे जसे की PIN + Biometric Verification किंवा Multi Factor Authentication लागू होऊ शकतात.
UTS अ‍ॅपऐवजी RailOne मोबाईल अ‍ॅप वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top