PAN India म्हणजे काय? अर्थ, फायदे, आव्हाने आणि उदाहरणे

PAN India म्हणजे काय? अर्थ, फायदे, आव्हाने आणि उदाहरणे

 

आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या कंपनी मध्ये कामाला आहात. तर कधी ना कधी Legal Department किंवा Account Department सोबत संबंध आलाच असेल.

तेव्हा तुम्ही “PAN India” हा शब्द ऐकलाच असेल. जर नसेल ऐकला तर तुमच्यासाठी विशेष ही माहिती.

पॅन इंडिया म्हणजे बऱ्याच जणांचा गोड गैरसमज “PAN CARD”.

PAN Card म्हणजे Permanent Account Number. पण PAN India हे कोणतेही डॉक्युमेंट नव्हे. पॅन इंडिया हा एक प्रकारचा कायदा आहे. ज्याचा पूर्ण अर्थ Presence Across Nation असा आहे.

PAN India चा उगम २००० दशकाच्या सुरुवातीस झाला. तेव्हा Reliance, Walmart सारख्या कंपन्यांनी संपूर्ण भारतभर आपला विस्तार प्रस्थापित करण्यास प्रारंभ केला.

ह्या कंपन्यांनी पॅन इंडिया धोरणाचा स्वीकार करून आपले देशभरातील असलेले अस्तित्व साध्य केले. या धोरणाचा मुख्य फायदा म्हणजे आपली ब्रँड ओळख देशभर पसरवण्यास मदत झाली.




What is PAN India | पॅन इंडिया म्हणजे काय

पॅन इंडिया म्हणजे Presence Across Nation. पॅन इंडिया चा वापर प्रामुख्याने कंपनीच्या संदर्भात केला जातो.

थोडक्यात सांगायचं झालं तर एका कंपनीचे मुख्य ऑफिस जर मुंबई मध्ये असेल आणि त्या कंपनीच्या वेगवेगळ्या ब्रॅंचेस वेगवेगळ्या शहरात असतील तर पॅन इंडिया लागू होते.

अश्या वेळेस प्रत्येक राज्यानुसार त्या कंपनीला स्वतंत्र्य कायदे लागू होतात. त्या कायद्यांअंतर्गत कंपनी ला व्यवहार करावा लागतो.

‘पॅन इंडिया’ (संपूर्ण भारतव्यापी) असणे का महत्त्वाचे आहे?

भारतामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. जिथे बोलीभाषा, चालीरीती, संस्कृती ही विविध स्वरूपाची आढळून येते.

भारतात व्यवसाय करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी हे मोठे आव्हान ठरते. अश्या वेळेस पॅन इंडिया धोरणाचा स्वीकार केल्यास एक विशिष्ट दृष्टिकोन तयार करता येऊ शकतो.

प्रत्येक राज्य सरकार नुसार व्यवसाय करण्यासाठी कायद्यांची तरतूद केलेली असते. त्या कायद्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण असते.

राज्य सरकारने घेतलेले नियम हे संपूर्ण राज्यभर लागू होतात. उलट केंद्र सरकार ने केंद्र स्थरावर घेतलेले सर्व निर्णय हे संपूर्ण देशभर लागू होतात.

पॅन इंडिया कंपनीचे उदाहरण द्यायचे झाले तर Amazon India.

ह्या कंपनीच्या बऱ्याच शाखा विविध राज्यांमध्ये आहेत. प्रत्येक राज्यात ह्या कंपनीला वेगवेगळी नियमावली आखून दिलेली असते. त्यानुसार व्यवहार करणे गरजेचे असते.

भारत देश हा वैविध्यपूर्ण आणि विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. त्यानुसार कोणताही व्यवसाय करताना कंपन्यांना बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागते.

जसे की, गरिबी, निरक्षरता, पर्यावरणाचे खच्चीकरण. तसेच सध्याचे युग हे स्पर्धात्मक असल्याने प्रत्येक व्यवसायात स्पर्धात्मक वाढ होणे गरजेचे आहे.

त्यासाठी केवळ एका राज्यात मर्यादित उद्योग करणे अशक्य. विविध राज्यात विविध संस्कृतीनुसार उद्योगाला चालना मिळण्यासाठी प्रत्येक कंपनीला विविध राज्यात व्यवसाय करावा लागतो.

संपूर्ण भारतव्यापी स्वरूपाची आव्हाने

पॅन इंडिया समोरचे मुख्य आव्हान म्हणजे देशातील पायाभूत सुविधा. आपल्या देशात अजूनही पायाभूत सुविधांची कमतरता आहे.

जसे की देशातील काही ठिकाणी वीज, पाणी आणि वाहतूक यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.

अश्या ठिकाणी व्यवसाय करणे आणि त्या लोकांपर्यंत योग्य त्या सुविधा पुरवणे कठीण होते.

भारतात २२ अधिकृत भाषा आहेत. आणि त्या सर्व भाषा सर्वच लोकांना बोलता येतात असं नाही.

विविध जातीप्रमाणे बोली भाषेमध्ये देखील फरक आढळून येतो. अश्या वेळेस व्यवसाय करण्यास मोठा अडथळा निर्माण होतो.

भारत सरकारने PAN India अंतर्गत देशभरामध्ये काही प्रकल्प राबवले आहेत. याची थोडक्यात माहिती आपण पुढे घेणार आहोत.

केंद्र सरकारद्वारे संपूर्ण भारतभर राबविण्यात आलेले काही प्रकल्प




Swachh Bharat Abhiyan – स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकारचा २०१४ चा एक यशस्वी प्रकल्प ठरला आहे.

ज्या मध्ये भारत सरकारने शहरी आणि ग्रामीण भागात स्वच्छतेवर भर दिला आहे.

ह्या प्रकल्पाअंतर्गत उघड्यावर शौचास बंदी आणून दुर्गंधीमुक्त प्रभाग करण्यास मोठे यश प्राप्त झाले आहे.

Ayushman Bharat – आयुष्यमान भारत

आयुष्यमान भारत हा प्रकल्प भारत सरकारने २०१८ मध्ये सुरु केला होता.

ह्या प्रकल्पाचे मुख्य ध्येय हे देशभरातील असुरक्षित घटकांना मोफत आरोग्यसेवा पुरवणे हे आहे.

Make in India – मेक इन इंडिया

भारत देशाला जागतिक स्थरावर उत्पादन केंद्र बनवण्यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये Make in India हा प्रकल्प सुरु केला.

देशी कंपन्यांना देशांतर्गत उत्पादने तयार करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि विदेशी गुंतवणुकीवर भर आणण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे.

अनेक विदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्यास सुरुवात देखील केली आहे.

संपूर्ण भारतभर असलेल्या उपस्थितीचे फायदे

ग्राहक बाजारपेठेत प्रवेश –

भारत १.३ अब्ज पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. यामध्ये ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

PAN India च्या साहाय्याने ह्या ग्राहक वर्गात प्रवेश करणे उद्योजकांना अगदी सोपे होते.

अर्थव्यवस्थेचे नियोजन –

देशातील काही ठिकाणे ही अर्थव्यवस्थेचे साधन ठरतात. अश्या शहरात योग्य रित्या उद्योग केल्यास उद्योगाला आर्थिक साहाय्य निर्माण होते.

ब्रँड ओळख –

पॅन इंडिया अंतर्गत येणाऱ्या व्यवसायांना Brand Visibility चा खूप फायदा होतो.

यामध्ये कंपन्यांचे ब्रँड आणि त्यांची ओळख सामान्य ग्राहकांपर्यंत अगदी सहज पोहोचते.

कौशल्यक्षमता –

भारत देशात कौशल्य दृष्टिकोन आढळून येतो. विविध शहरात विविध कुशल क्षमता असणाऱ्या व्यक्ती असतात.

त्यांचा योग्य क्षेत्रामध्ये वापर केल्यास व्यवसायाला आणखी मदत मिळते.




हे देखील वाचा: Students साठी 05 Best AI Tools – अभ्यास होईल Easy आणि Smart

 

तर असा हा PAN India प्रकल्प असून PAN Card नव्हे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top