2FA - Two Factor Authentication
या डिजिटल जीवनात आपल्या डिजिटल गोपनीयतेची जबाबदारी ही देखील प्रामुख्याने आपलीच आहे. आपण वापरत असलेल्या प्रत्येक अँप्लिकेशन मध्ये 2FA – Two Factor Authentication हा पर्याय दिलेला असतो.
पण आपल्यापैकी फारच कमी लोक ही सेटीन्ग्स ऍक्टिव्ह करतात. 
काहींना तर 2FA काय आहे हेच माहिती नाही. तर अश्याच मंडळींसाठी आपण सविस्तर माहिती इथे सांगणार आहोत.
2FA - Two Factor Authentication म्हणजे काय?
वापरकर्त्याच्या संबंधित डिजिटल खात्याला Password व्यतिरिक्त आणखी सुरक्षा प्रदान करणे हा 2FA चा मुख्य हेतू मानला जातो.
यामध्ये तुम्हाला पासवर्ड ऐवजी ओळख पटवण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारची पडताळणी मागितली जाते.
सर्वप्रथम पासवर्ड ही एकच सुरक्षा संबंधित अकाउंट ला असते, पण 2FA मध्ये तुमच्या मोबाईल वर OTP देखील पाठवला जातो.
जर हा OTP तुम्ही तिथे दिला तरच ते अकाउंट ओपन किंवा लॉगिन होते, अन्यथा विनंती रद्द होते.
तसेच मोबाईल वर वापरत असाल तर Biometric हा पर्याय देखील विचारला जातो.
2FA कसे कार्य करते?
तुमचे एखादे डिजिटल खाते पासवर्ड देऊन उघडण्याचा प्रयत्न करता तेव्हा हे २ एफ ए सिस्टिम पासवर्ड व्यतिरिक्त अन्य ओळख विचारते, जसे की –
- Mobile OTP
- Biometric
- Google Authenticator
यापैकी १ जरी ओळख तुम्ही योग्यरीत्या पार केली तर लगेचच तुमचे संबंधित खाते उघडले जाते.
2FA चे फायदे -
अतिरिक्त सुरक्षेची हमी – तुमचा पासवर्ड जरी कोणाला समजला तरी या फॅक्टर मुळे समोरील व्यक्ती तुमचे खाते तुमच्या इतर परवानगीशिवाय उघडू शकणार नाही.
सायबर हल्ला सुरक्षा – थोड्या फार प्रमाणात सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ता राखण्यास मदत होते.
वैयक्तिक माहितीचे जतन – २एफ ए मुळे तुमची गोपनीय माहिती सुरक्षित राहण्यास मदत होते.
एकंदरीतच सांगायचं झालं तर तुमची सर्वच माहिती तुम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत अन्य व्यक्ती वापरू शकत नाही.
तुमचे Bank अँप्लिकेशनं असो, वा Digital Media अकाउंट असो, जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे 2FA सेक्युरिटी लागू करा, आणि तुमच्या अमूल्य माहितीचे जतन करा.

