Introduction to Spoken English - इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी?

तर मंडळी Introduction to Spoken English या मालिकेमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण इंग्रजी भाषेचे मराठीत रूपांतर पाहणार आहोत.

तुम्हाला तुमची मातृभाषा व्यवस्थित आणि निखळ माहिती असेल तर तुम्हाला हे आणखीनच सोपे जाणार आहे.

असं म्हंटल जात की मराठी भाषा जशी वळवणार तशी ती वळते, तसेच काहीसे इंग्रजी भाषेचे देखील आहे.

जसे मराठी भाषेत एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात तसे इंग्रजी भाषेत सुद्धा काही शब्दांचे अनेक अर्थ निघतात.

  • उदा.१ Bat: A flying Mammal or a piece of Sports Equipment. – बॅट म्हणजेच वटवाघुळ: उडणारा सस्तन प्राणी किंवा क्रिकेट मधील बॅट.
  • उदा.२ Date: A specific Day or a Fruit. – तारीख हा नेहमीच उच्चरला जाणारा शब्द, पण एक विशेष फळ देखील आहे ज्याला date नावाने संबोधले जाते ते म्हणजे खजूर.
  • उदा.३ Fall: The Season or to Drop. – Fall Season म्हणजेच शरद ऋतू आणि दुसरा अर्थ म्हणजे गळून पडणे.
  • उदा.४ Match: A small Fire-Starter or a Competition. – Match म्हणजेच स्पर्धा किंवा आपण Match Box म्हणजे आग लावण्यासाठी वापरली जाणारी काडेपेटी.

याआधी तुम्हाला हे माहिती होत का ? मग हीच खरी गम्मत आहे इंग्लिश शिकण्यामागे.

इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी? (Introduction to Spoken English)

English बोलायला सुरुवात करण्याआधी ती योग्य समजून घेणे गरजेचे आहे.

कोणतेही काम करत असताना त्या कामाबद्दल सविस्तर माहिती असेल तर तुम्ही ते अगदी सहजरित्या पार पाडू शकता.

त्यासाठी English भाषेचे विश्लेषण तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. पण मंडळी तुम्हाला तुमचा English To Marathi शब्दकोश ठामपणे माहिती असायला हवा.

जसे Table या शब्दाला आपण मराठी मध्ये “तक्ता” असे संबोधतो तर रोजच्या वापरात टेबलं ही वापरायोग्य वस्तूचे रूप आहे.

Lesson 2: Daily Use English Words with Marathi Meaning

यामध्ये आपण दैनंदिन वापरातील शब्दकोश आणि काही शब्दांची माहिती घेणार आहोत.

त्यामुळे “Speak English Easily” – “मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका” ही मालिका अगदी शेवटपर्यंत वाचा आणि आपला अभिप्राय कंमेंट मध्ये कळवा.

1 thought on “Introduction to Spoken English – इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करावी?”

  1. Pingback: Speak English Easily – मराठीमधून इंग्रजी बोलायला शिका

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top