Property New Rules 2026 - मालमत्ता नवीन नियम २०२६

मुंबई, पुणे सारख्या गजबजलेल्या ठिकाणी अनेकांची हक्काची घरे आहेत. ही घरे आपण भाडेतत्वावर लावतो. पण असे करत असताना Property New Rules 2026 सविस्तर जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.

उत्पनाचा एक स्रोत म्हणून आपण आपल्या वैयक्तिक घरात भाडेकरू ठेवतो. असे करत असताना नक्कीच नियमावलीचे पालन होणे गरजेचे आहे.

अश्यातच २०२६ मध्ये सरकारतर्फे काही नियम बदलण्यात आले आहेत.

काय आहे नियमावली? कोणासाठी असणार आहे ही नियमावली? सविस्तर माहिती आपण आमच्या वेबसाईट वर पाहणार आहात.

Property New Rules 2026

आम्ही मिळवलेल्या अन्य स्रोतांच्या माहितीनुसार, मॉडेल टेनेन्सी ऍक्ट (Model Tenancy Act) वर आधारित हे नियम असणार आहेत.

या कायद्यानुसार कोणत्याही करारावर सही केल्यानंतर ६० दिवसांमध्ये हा करार डिजिटली सही आणि रजिस्टर करावा लागणार आहे.

या आधी आपण फक्त स्टॅम्प पेपर वर मालक आणि भाडेकरूंच्या सह्या घेऊन करार तिथेच ग्राह्य धरला जात होता, पण ह्या कराराची सरकारी नोंदणी होत नव्हती.

यात विशेष बाब म्हणजे ६० दिवसांच्या आत जर ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली नाही तर ५००० रुपयांपासूनच दंड देखील आकारण्यात येणार असल्याची माहिती आहे.

याशिवाय सिक्युरिटी डिपॉझिट्स, भाडं वाढवणं, जागा रिकामी करायला सांगणं यासाठीचे नियमही अधिक स्पष्ट आखण्यात आले आहेत.

काही ठिकाणी घरमालक ह्यापूर्वी ६ ते १० महिन्यांचं भाडं सेक्युरिटी डिपॉजिट म्हणून घेत होते.

तेच ह्या कायद्याअंतर्गत आता घरमालकांना फक्त २ महिन्यांची भाडे रक्कम डिपॉजिट म्हणून घेता येणार आहे.

घरभाडं केव्हा आणि किती वाढवता येईल?

  • घरभाडे वाढवण्याची मुदत थेट प्राथमिक करार संपल्यानंतर देण्यात आली आहे. आणि भाडेकरूला ९० दिवसांच्या अगोदर हे कळवणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे.
  • भाडे रक्कम जर रु. ५००० पेक्षा जास्त असेल तर डिजिटल युपीआय किंवा बँक ट्रान्सफर द्वारे ही रक्कम स्वीकारावी लागणार आहे, रोख स्वीकारता येणार नाही.
  • इतकेच नाही तर रु. ५०,००० पेक्षा जास्त भाडे असल्यास टीडीएस देखील भरावा लागणार आहे.
  • तसेच मुदतीपूर्वी घर रिकामं करून हवं असल्यास घरमालकाला रेंट ट्रिब्युनलकडून घर रिकामं करण्याची नोटीस (Eviction Order) घ्यावी लागेल.

भाडेकरुंसाठी लाभदायक हे नवे नियम -

  • खोलीमालकांना संबंधित खोली तपासण्यासाठी आता भाडेकरूंची परवानगी आवश्यक असणार आहे.
  • तुम्हाला खोली तपासायची असल्यास भाडेकरूला २४ तास आधी कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • सदर खोलीचे दुरुस्ती काम जर भाडेकरूंनी निदर्शनास आणले, आणि ते मूळमालकाने ३० दिवसांच्या आत करून न दिल्यास भाडेकरू स्वःखर्चानें ते काम करून घेऊ शकतात.
  • दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या खर्चाची पावती मूळ मालकाला देऊन पैसे मिळवण्याचा अधिकार भाडेकरूला राहणार आहे.
  • तर मंडळी, २०२६ च्या सुरुवातीलाच ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तेव्हा आजच संपूर्ण कायदेशीर माहिती मिळवा आणि मगच तुमचा करार पूर्ण करा.

हे ही वाचा:- RBI mandate to change a Bank domain

सूचना:- संबंधित माहिती ही इंटरनेट वरील विविध स्रोतांच्या मदतीने सांगण्यात आली आहे.

तरीही अधिक माहितीसाठी वैयक्तिक तपासणी करणे हा तुमचा निर्णय राहील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top