Blow on the coals - निखाऱ्याला फुंकर

Blow on the coals – निखाऱ्याला फुंकर – ही कथा तुमचा गमावलेला आत्मविश्वास नक्कीच परत आणेल ही खात्री व्यक्त करतो आणि कथेला सुरुवात करतो.

अनुभवाचे बोल -

माझी आजी माझ्या लहानपणी नेहमी सांगायची ते असे की, आपल्याला नशिबाने जे काही मिळाले त्यातले थोडे का होईना आपण इतरांसोबत वाटून घ्यायचे.

९० च्या दशकातल्या सगळ्यांच्याच आज्यांची हीच शिकवण.

असो, पण हे मिळालेले वाटत असताना, आणि स्वःकष्टाने मिळवलेले वाटत असताना, काहीश्या भावना वेगळ्या असतात.

आपण मिळालेले वाटत असतो तेव्हा कसलाच किंतु परंतु मनात येत नाही.

पण तेच आपण स्वतः कष्टाने मिळवलेले वाटत असतो तर मात्र त्याचा मोबदला मिळावा हीच आपली इच्छा प्रकट होते.

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या किंवा आपल्याच परिचयात असणाऱ्या अनेकांमध्ये काही नं काही कलागुण असतात.

गरज असते ती सांत्वनाची, प्रोत्साहित करण्याची. असेच माझ्याही परिचयातले काही जण आहेत, म्हणजे होते असं सध्या म्हणायला हरकत नाही.

माझ्या आईने लावलेल्या सवयीनुसार माझा स्वभाव थोडा दिलदार. आता स्वतःची तारीफ स्वतःच करतोय पण पुढे धमाल आहे त्यामुळे व्यवस्थित वाचा.

माणुसकीतला आत्मसन्मान -

मी सामान्य कुटुंबातला वाणिज्य शाखेतून पदवी मिळवलेला मुलगा.

मनातून विचारांचा अथांग महासागर रोज उसळ्या घेऊन सांगत होता की काही तरी वेगळं करायचं आहे.

असं असताना काही शिक्षणबाह्य कला मी स्वतःला अवगत केल्या, जसे की ग्राफिक डिजाईन करणे, संगणक दुरुस्ती करणे, व्हिडिओ एडिटिंग करणे आणि अन्य..

शीर्षकात म्हंटल्याप्रमाणे माझ्यात असे कलाकुसरीचे बरेच निखारे भरलेले होते.

आणि बरेच जण सवडीनुसार फुंकर घालून स्वतःची कामे करून घेत होते पण त्याच्या मोबदल्याबद्दल कधी कोणी बोलतच नव्हते.

कालांतराने ही बाब आईच्या लक्षात आली. तेव्हा आई उलट शिकवणी देऊ लागली की ते इतरांना मदत करणं सोडून दे, आपला त्यात काय फायदा?

दोन पैसे भेटले असते तर तेवढाच आधार. यात माऊलीची काही चूक नाही बरं का!

पण शेवटी ते पारंपरिक रित्या अंगवळणी लागलेले संस्कार आहेत ते असेच थोडी ना दूर लोटले जाऊ शकतात.

कलेचा प्रत्यक्ष लाभ -

एक किस्सा असा घडला की वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलेले असून सुद्धा मला थोडं तांत्रिक ज्ञान इतरांच्या तुलनेत जास्त असल्याने, मला ते इतरांना शिकवण्यात माझा येत असे.

पण त्यासाठी कधी रक्कम आकारणीबद्दल माझ्या मनात विचार आलाच नाही. कारण माणुसकी हा संस्कार माझ्यात ठासून रोवला गेला होता.

असेच बोलता बोलता एका सवंगड्याला मला अवगत असलेल्या कलेमधील एका कलेमध्ये मी तयार केला.

आणि दीड एक वर्षाच्या अवधीतच त्याच्या स्वःकष्टाच्या बळावर तो समाजात नाव घडवू लागला.

ही गोष्ट माझ्या मनाला आनंद देणारी होती कारण त्याचा गुरु नाही म्हणता येणार, इतका ही मी मोठा नाही पण मार्गदर्शक म्हणून मी होतो.

त्याच्यात तो कलेला आत्मसात करणारा निखारा धगधगत होता आणि त्याला निमित्तमात्र फुंकर म्हणून मी ठरलो होतो.

असो, त्याला मार्गदर्शन जरी माझे लाभले असले तरी ते यश त्याने स्वतः ओढून आणले होते.

पण तरीही माझ्या मनाला एक खंत टोचत होती, त्याचे झाले माझे का नाही ? ह्या प्रश्नाने झोप येत नव्हती.

आत्मसन्मानाच्या निखाऱ्याला फुंकर -

पण शब्दांच्या दुनियेत खेळणारा मी असा निराश होईन असं माझ्या अंतर्मनाला वाटलंच कसं?

मग मी माझ्यात असणाऱ्या निखाऱ्याला फुंकर घालायला सुरुवात केली.

त्यावर अगोदरच नाश पावलेला कोळसा बाजूला सारून नव्याने ऊर्जा निर्माण केली आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे मला सापडू लागली.

त्याला मी मार्ग दिला पण वाट त्याने निवडली, तो चुकला तिथे त्याने माझा आधार घेतला आणि तो सातत्याने पुढे जात राहिला, पण मी!

मी काय केले? आज करू उद्या करू असं म्हणून स्वतःचा पेटता निखारा मात्र कधी शांत झाला समजलेच नाही.

खरं तर त्याने जो वणवा आता पेटवला तो मी खूप आधीच पेटवायला हवा होता. माझ्यात असलेल्या कलांना मी खूप आधीच दुजोरा दिला पाहिजे होता.

कलेचा सन्मान -

त्यात स्वतःहून आत्मसात झालेली ही लेखन कला म्हणजे माझे अहोभाग्यच म्हणावं लागेल.

मी तर म्हणेन, मराठी भाषेचा लेखक होण्याचे स्वप्न बाळगणे म्हणजेच स्वतःच्या मनाच्या निखाऱ्याला खऱ्या अर्थाने फुंकर घालून वणवा पेटवणे.

आणि खरंच हा वणवा पेटला तरच माझे मन शांत होईल असे मला वाटते.

वाचन कलेचा फार अनुभव नसताना, भाषेसंदर्भात मला वैयक्तिक असा कोणताही गुरु नसताना शब्दरचनेकडे मन वळणे म्हणजे हा पेटता निखाराच जणू!

ह्याच विचारांचा ज्वलंत निखारा मनात घेऊन पुन्हा नव्याने येतोय लवकरच!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top