Digisave Youth Account - तरुणांसाठी स्मार्ट बँकिंगची सुरुवात!
तुम्ही Digisave Youth Account बद्दल ऐकले आहे का? नसेल ऐकले तर मग हा ब्लॉग नक्की वाचा. इथे आपण Digisave Youth Account संबंधित माहिती घेणार आहोत.
बँक अकाऊंटच्या नावातच Youth लिहिलेलं आहे म्हंटल्यावर हे खाते नक्कीच तरुणांसाठी असणार.
मग याचा वापर नक्की कसा होतो? तरुण पिढीला याचे होणारे फायदे, ही सर्व माहिती सविस्तर रूपात तुम्हाला सांगणार आहे.
Digisave Youth Account म्हणजे काय?
“Digisave Youth Account” हे 18 ते 25 वयोगटातील तरुणांसाठी असलेले एक डिजिटल बचत खाते आहे. ही सेवा HDFC बँकेमार्फत दिली जाते.
हे खाते तुम्हाला पूर्णतः ऑनलाइन उघडता येते – म्हणजेच KYC, खाते उघडणे, ATM कार्ड, आणि मोबाईल बँकिंग सर्व काही मोबाईलवरूनच करता येते.
या खात्याचे प्रमुख उद्दिष्ट
आजकाल तरुण पिढीचा डिजिटल क्षेत्रामधील वाढत कल लक्षात घेता बँकेने ही सेवा सुरु केली असावी असे म्हणायला हरकत नाही.
ही सेवा सुरु करताना बँकेने नक्कीच काही उद्धिष्टांचा विचार केला आहे, ती पुढीलप्रमाणे –
- तरुणांना डिजिटल बँकिंगची सवय लावणे
- स्मार्ट मनी मॅनेजमेंट शिकवणे
- सेव्हिंग, बजेटिंग, पेमेंट्स आणि इन्व्हेस्टमेंट्स याबद्दल जागरूकता वाढवणे
- बँकिंगची सर्व सुविधा मोबाईलवर सहज उपलब्ध करून देणे.
Digisave Youth Account ची मुख्य वैशिष्ट्ये
💳 झिरो बॅलन्स सुविधा – या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही.
🔐 सुरक्षित UPI आणि मोबाईल बँकिंग – ही सेवा डिजिटल असल्याकारणाने सर्व व्यवहार सुरक्षित पद्धतीने म्हणजे OTP व PIN द्वारे करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
💸 Instant Fund Transfer – NEFT, RTGS, IMPS आणि UPI द्वारे तात्काळ पैसे पाठवण्याची देखील सुविधा इथे उपलब्ध असणार आहे.
📊 Expense Tracker – तरुण पिढीची मुख्य समस्या म्हणजे खर्चाचे व्यवस्थापन, हे देखील सहजरित्या शक्य होणार आहे.
🪙 Reward Points आणि Cashback – अनेक रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक पद्धतीने तुम्हाला ऑफर्स दिल्या जाणार आहेत. जेणेकरून तुम्हाला आर्थिक व्यवहारामध्ये आणखी उत्सुकता निर्माण होईल.
🧾 E-Statement सुविधा — प्रत्येक महिन्याचा व्यवहार रिपोर्ट ईमेलद्वारे मिळवण्यासाठी पर्याय उपलब्ध असणार आहे.
🎁 Discounts & Offers — ऑनलाइन शॉपिंग, OTT, आणि फूड अॅप्सवर आकर्षक ऑफर्स देखील मिळणार असल्याची माहिती आहे.
हे खाते उघडण्यासाठी वयोगटाच्या मर्यादा व लागणारी कागदपत्रे -
18 ते 25 वर्षे असलेल्या वयातील तरुण तरुणी हे बँक खाते उघडू शकतात.
संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे ही मुख्य अट आहे.
वैध ओळखपत्र (Aadhaar / PAN) असणे गरजेचे आहे. KYC प्रक्रियेदरम्यान याचा उपयोग होणार आहे.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सक्रिय असणे आवश्यक आहे. संबंधित कामकाजाची तंतोतंत माहिती तुम्हाला वेळेवर मिळण्यास मदत होते.
लागणारी कागदपत्रे –
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सेल्फी फोटो (KYC साठी)
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
खाते पूर्णतः व्हिडिओ KYC द्वारे उघडले जाते – त्यामुळे शाखेत जाण्याची गरज नाही.
या खात्याचे तरुण पिढीला होणारे विशेष फायदे -
- आर्थिक शिस्त शिकण्यास मदत होते.
- डिजिटल ट्रान्झॅक्शनचा अनुभव हा सध्याच्या काळात खूप गरजेचं विषय आहे.
- बँकिंगचे सर्व फायदे एकाच मोबाईल अँप्लिकेशन मध्ये मिळतात.
- पहिल्याच खात्यातून इन्व्हेस्टमेंट्स सुरू करण्याची सोय. वेगळे असे डिमॅट खाते उघडण्याची गरज नाही.
- आर्थिक स्वावलंबनाची पहिली पायरी म्हणून तरुण पिढी या खात्याचा आधार नक्कीच घेऊ शकते, आणि स्वतःला आर्थिक साक्षर घडवू शकते.
Digisave Youth Account कसे उघडावे?
- बँकेचे अधिकृत अॅप डाउनलोड करा (उदा. XYZ Bank App)
- “Open Digisave Youth Account” पर्याय निवडा
मोबाईल नंबर व OTP ने रजिस्टर करा - Aadhaar व PAN लिंक करा
- व्हिडिओ KYC पूर्ण करा
- काही मिनिटांत खाते उघडले जाईल आणि डेबिट कार्ड तपशील मिळतील
तरुणांसाठी का उपयुक्त आहे हे खाते?
आजच्या तरुण पिढीला आर्थिक साक्षरतेचे धडे हे प्रात्यक्षिक रूपात मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी Digisave Youth Account खूप फायद्याचे ठरणार आहे.
पैशाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण, डिजिटल व्यवहाराची सवय आणि विशेष म्हणजे बचतीची गोडी लागणे या सर्व सवयी आपसूकच या पिढीला मिळणार आहेत, आणि ते आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि आत्मनिर्भर होणार आहेत.
वरील संपूर्ण माहिती इंटरनेट वरील उपलब्ध डेटा अंतर्गत सांगण्यात आली आहे.
तरीही कोणतीही नोंदणी करण्याअगोदर संबंधित बँक शाखेला अवश्य भेट द्या आणि आणखी सविस्तर माहिती मिळवा.

Pingback: UAN - Universal Account Number