Digital Banking Revolution - Improvements in Cheque Clearing System Explained

नवीन नियमावलीनुसार ४ ऑक्टोबर २०२५ पासून बँकेत धनादेश वटवणी (Cheque Clearing System) मध्ये बदल करण्यात आले आहेत. Digital Banking Revolution – Improvements in Cheque Clearing System मध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

Cheque Clearing संबंधित नियमात केला RBI ने बदल -

बदललेल्या नियमानुसार चेक क्लिअरिंग प्रणाली आता जलद म्हणजे २ ते ३ दिवसावरून अवघ्या काही तासांवर आली आहे.

४ ऑक्टोबर पासून आरबीआय ने लागू केलेल्या नियमानुसार आता तुम्ही बँकेत जमा केलेले चेक काही तासातच क्लिअर होऊन व्यवहार पूर्ण होणार आहे.

४ ऑक्टोबर पासून लागू होणारी नवी नियमावली -

संबंधित नियमावली २ टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.

त्यातील पहिला टप्पा ३ ऑक्टोबर ते ३ जानेवारी २०२६ पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा तिथून पुढे सुरु केला जाईल.

यामध्ये व्यवहाराचे थेट सादरीकरण हे दिवसातून एकदाच म्हणजे १० ते ४ या वेळेत होईल.

तुम्हाला याच वेळेत चेक सादर करावा लागेल.

नंतर चेक स्वीकारणाऱ्या बँकेला तो चेक लगेचच स्कॅन करून क्लिअरिंग हाऊस ला पाठवावा लागेल.

क्लिअरिंग हाऊस त्या चेक ची प्रतिमा समोरच्या बँकेला पाठवेल.

यामध्ये वेळेचे बंधन म्हणजे Item Expiry Time हे सत्र असेल, दिलेल्या वेळेतच समोरच्या बँकेला पॉसिटीव्ह किंवा नेगीटिव्ह रिप्लाय देणे बंधनकारक राहील.

जर काही कारणास्तव असे न झाल्यास रिक्वेस्ट Auto Approved होईल. सध्या ही वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत असेल.

नंतरच्या टप्प्यात तीन तास कमी करून म्हणजेच पेमेंट करणाऱ्या बँकेला रिक्वेस्ट आल्यानंतर तीन तासांच्या आतच योग्य रिप्लाय करणे बंधनकारक राहील.

ग्राहकांसाठी सूचना -

  • तुम्ही ज्या दिवशी चेक बँक मध्ये जमा करणार त्याआधी तुमच्या बँक खात्यात तेवढी रक्कम शिल्लक असणे गरजेचे आहे.
  • ₹५०००० वरील व्यवहारांसाठी २४ तास आधी तुमच्या चेक चा तपशील बँकेला कळवणे बंधनकारक आहे.

    यामुळे तुमच्या व्यवहार प्रणाली मध्ये सुरक्षा राखली जाऊ शकते.

ग्राहकांचे फायदे -

  • या आधी चेक ने व्यवहार करणे म्हणजे २ ते ३ दिवस वाट पाहणे हा एकच पर्याय ग्राहकांसमोर असायचा.
  • आरबीआय च्या बदललेल्या नियमावलीनुसार आता अवघ्या काही तासातच तपासणी आणि व्यवहार प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

आता चेक ने व्यवहार जलद व सुरक्षित होणार असे RBI च्या नवीन धोरणानुसार दिसून येते.

संबंधित माहिती ही इंटरनेट वरील सामग्रीच्या आधारे सांगण्यात आलेली आहे.

अधिक व सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेला अवश्य भेट द्या..

1 thought on “Digital Banking Revolution – Improvements in Cheque Clearing System”

  1. Pingback: Digisave Youth Account - तरुणांसाठी स्मार्ट बँकिंगची सुरुवात!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top