Namdev Vhatkar – Follower of Babasaheb - नामदेव व्हटकर - बाबासाहेबांचे अनुयायी

६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर चौपाटीवरील “चैत्यभूमी” येथे एकत्र येतात. त्यातीलच एक अनुयायी म्हणजे Namdev Vhatkar – Follower of Babasaheb – नामदेव व्हटकर – बाबासाहेबांचे अनुयायी.

हे नाव जरी फार कमी ऐकिवात असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या व्यक्तीसोबत फार जवळचा संबंध आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या बुद्धिमान, कायदेतज्ज्ञ आणि प्रखर व्यक्तीसाठी नामदेव व्हटकरांनी स्वतःचे आयुष्य वेचून दिले.

बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची अंतिम यात्रा हा देखील एक वेगळा इतिहास आहे. फारच कमी लोकांना तो माहित असेल असे मला वाटते.

असो, “Namdev Vhatkar – Follower of Babasaheb” – “नामदेव व्हटकर – बाबासाहेबांचे अनुयायी” या आपल्या ब्लॉग मध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

नामदेव व्हटकर कोण होते ?

नामदेव लक्ष्मण व्हटकर – Namdev Laxman Vhatkar. यांचा जन्म २४ ऑगस्ट १९२१ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मसूदमाले या गावी झाला.

व्हटकर यांची परिस्थिती खूप बेताची असून देखील त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

प्रसिद्ध लेखक, संगीतकार, कुशल प्रशासक, लोककलेचे अभ्यासक, प्रगतीशील शेतकरी, स्वातंत्र्य सैनिक, जागरूक आमदार, चित्रपट निर्माते अशी त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते.

त्याकाळी संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला होताच तरीही बाबासाहेब आंबेडकर असो कि नामदेव व्हटकर असो यांची कहाणीच वेगळी होती.

अश्यातच ६ डिसेंबर १९५६ हा दिवस आणि नामदेवांच्या कानावर एक दुःखद बातमी आली.

या बातमीने फक्त नामदेव दुःखी नव्हते तर लाखोंच्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी देखील दुःखाच्या कचाट्यात होते.

ही बातमी म्हणजे बाबासाहेबांचे निधन. संपूर्ण जनआक्रोश मुंबईच्या दिशेने येऊ लागला. कोल्हापूर स्थित नामदेव व्हटकर देखील अस्वस्थ झाले.

बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी असल्याने त्यांनी ही अंतयात्रा स्मरणीय करण्यासाठी यात्रेचे विडिओ शूटिंग तयार करण्याचा निर्णय घेतला.

कॅमेरा मिळवण्यासाठी नामदेवांचा धाडसी निर्णय -

नामदेव यांनी त्याकाळी भाडेतत्वावर कॅमेरा मिळवण्यासाठी त्यांची प्रिंटिंग प्रेस गहाण ठेवली. आणि त्या संपूर्ण दिवसाचे चलचित्र त्यांनी शूट केले.

नामदेवांच्या या कृतीमुळे बाबासाहेबांचे अंतिम मुखदर्शन आजही आपल्याला उपलब्ध आहे.

नामदेव इतक्यावरच थांबले नाहीत तर या शूटिंग ची Documentary तयार करण्यासाठी देखील खूप खर्च येणार होता, त्यामुळे त्यांनी आपले राहते घर देखील गहाण ठेवले.

अखेर पर्यंत मात्र त्यांना प्रेस आणि घर हे दोन्ही परत मिळवता आलेच नाही.

पण त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांचे दुःख, अनेकांच्या भावना, वेदना, बाबासाहेबांप्रतीचा आदर कायमचा चलचित्रामध्ये टिपला गेला.

याचसोबत भारताला आपली पहिली Documentary फिल्म सुद्धा मिळाली.

नामदेव व्हटकरांचे साहित्य -

कादंबरी – अपराधी, झोपाळा, वाट चुकली, काळजाची हाक आणि इतर. (संबंधित माहिती मराठी विश्वकोश यांच्या संकेतस्थळावरून मिळवण्यात आलेली आहे.)

नामदेव व्हटकरांना महाराष्ट्र शासनातर्फे दलित मित्र पुरस्कार (१९७१), कोल्हापूर जिल्हा परिषदेचा राजर्षी शाहू पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले आहे.

आणखी वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top