Pradhan Mantri Viksit Bharat Rozgar Yojana - How to Get ₹15,000 Incentive
PMVBRY योजना म्हणजे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना – Pradhan Mantri Viksit Bharat Rozgar Yojana.
ही भारत सरकारची रोजगार प्रोत्साहन योजना आहे जी नवीन नोकऱ्या निर्माण करणे आणि युवकांना औपचारिक रोजगारात आणणे यासाठी सुरू करण्यात आली आहे.
Pradhan Mantri Viksit Bharat Rozgar Yojana – How to Get ₹15,000 Incentive?
या योजनेमध्ये कोण असणार लाभार्थी? सरकारतर्फे ₹१५००० मिळणार Incentive. नक्की भानगड काय? विषय तुमच्या हिताचा, माहितीचा मार्ग आमचा मोलाचा..
PMVBRY म्हणजे नक्की काय?
PMVBRY म्हणजेच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना – (Pradhan Mantri Viksit Bharat Rozgar Yojana).
भारत सरकार द्वारे ही योजना 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीसाठी लागू करण्यात आलेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारत देशात रोजगार निर्मिती करणे, इतकेच नाही तर युवा पिढीला आर्थिक प्रोत्साहन देणे हा आहे.
नवनवीन कंपन्यांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे यामुळे कंपन्या रोजगारनिर्मिती क्षेत्रामध्ये भर देण्यास अधिक प्राधान्य देतील.
EPFO सुविधेला अधिक चालना देणे हा देखील एक उद्देश आहे जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचा कालावधी
PMVBRY Pradhan Mantri Viksit Bharat Rozgar योजनेचा कालावधी हा 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या मर्यादित वेळेसाठी निश्चित करण्यात आला आहे.
भारत सरकारचे प्रमुख ध्येय, देशामध्ये सुमारे 3.5 कोटी रोजगार निर्माण करणे हे आहे. योजनेच्या खर्चाचे नियंत्रण देखील महत्वाचे असते.
या कमी वेळात कंपनी आणि कामगार दोघांना योजनेचा लाभ मिळणार असल्याने कामगार काम करण्यासाठी आणि कंपन्या रोजगार निर्मितीसाठी उत्सुक असतात.
योजनेचा कालावधी मर्यादित का ठेवला आहे?
PMVBRY योजनेचा कालावधी ठराविक ठेवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशात अल्पावधीत जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे आणि सरकारी खर्चाचे प्रभावी नियोजन करणे होय.
मर्यादित कालावधी असल्यामुळे उद्योग आणि कंपन्या नवीन कर्मचारी भरती करण्यासाठी तत्काळ पुढाकार घेतात, ज्यामुळे रोजगार वाढीला वेग मिळतो.
तसेच ठराविक कालावधी संपल्यानंतर सरकारला योजनेचा परिणाम, लाभार्थ्यांची संख्या आणि रोजगार निर्मितीचे प्रमाण यांचे मूल्यांकन करून पुढील धोरणात्मक निर्णय घेणे सोपे होते.
जसे की योजना वाढवणे, सुधारणा करणे किंवा नवीन योजना सुरू करणे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला मदत होते.
हे देखील वाचा:- RBI mandate to change a Bank domain
या योजनेचा लाभ कसा घेता येईल?
या योजनेचे A आणि B असे विभाजन केले गेले आहे. A विभाजनात कर्मचारी लाभार्थी असतील तर B विभाजनात नियोक्ता (Employer) लाभार्थी ठरणार आहेत.
A: कर्मचाऱ्यांसाठी लाभ
- १ ऑगस्ट २०२५ पासून ज्या कर्मचाऱ्यांची प्रथमच EPFO नोंदणी होणार आहे अश्याच कर्मचाऱ्यांना योजनेचा योग्य लाभ मिळणार आहे.
- या तरुणाईला सरकारतर्फे ₹१५००० Incentive स्वरूपात मिळणार आहे.
- रक्कम जरी लहान असली तरी ही रक्कम २ टप्प्यात मिळणार आहे.
- पहिला हफ्ता ६ महिने आणि दुसरा हफ्ता १२ महिन्यांनी मिळणार आहे.
यासाठी काही अटी देण्यात आल्या आहेत, अटी पुढीलप्रमाणे-
- कर्मचारी पहिला हफ्ता मिळवण्यासाठी ६ महिने एकाच कंपनीमध्ये ६ महिने काम करणे अनिवार्य आहे.
- दुसरा हफ्ता १२ महिन्यांनी मिळवण्यासाठी Financial Literacy Course पूर्ण करणे गरजेचे आहे.
- संबंधित कोर्स पूर्ण केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना दुसरा हफ्ता मिळणार आहे.
Financial Literacy Course म्हणजे काय?
हा छोटा ऑनलाइन कोर्स खालील विषय शिकवतो:
- पैसे कसे बचत करावेत
- बँक खाते, PF, विमा यांचे महत्त्व
- EMI, कर्ज, व्याज यांची समज
- गुंतवणूक (SIP, Insurance, Pension) याची प्राथमिक माहिती
- आर्थिक नियोजन आणि भविष्याची बचत
हा कोर्स नव्याने नोकरी सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी अनिवार्य ठेवला आहे.
आर्थिक मिळकतीसोबतच आर्थिक नियोजन देखील महत्वाचे असते याच उद्देशाने हा कोर्स अनिवार्य करण्यात आला आहे.
कोर्स पूर्ण का करावा लागतो?
- PMVBRY या योजनेमध्ये मिळणार प्रोत्साहन निधी ₹15,000 दोन हप्त्यांत मिळतो.
- पहिला हप्ता – 6 महिने नोकरी पूर्ण झाल्यावर मिळतो तर दुसरा हफ्ता 12 महिने नोकरी आणि Financial Literacy Course पूर्ण केल्यानंतर मिळतो.
B: नियोक्ता (Employer) साठी लाभ
- नियोक्त्याला प्रति नवीन कर्मचाऱ्यांसाठी ₹1,000 ते ₹3,000 प्रति महिना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
- हा प्रोत्साहन निधी साधारण 2 वर्षे आणि (उत्पादन क्षेत्रासाठी 4 वर्षे) असा लाभ नियोक्त्याला मिळणार आहे.
यामुळे नियोक्ता व कंपन्या रोजगार निर्मितीकडे अधिक आकर्षित होणार असे प्राथमिक दिसून येते.
कर्मचारी पात्रता (Eligibility)
- १ ऑगस्ट २०२५ पासून EPFO मध्ये नव्याने नोंद असणे गरजेचे आहे.
- तुमचे किमान वेतन हे ₹ १,००,०० इतके असणे गरजेचे आहे.
- सोबतच तुमची संबंधित कंपनी या योजनेअंतर्गत नोंदणी असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला योजनेचा पहिला हफ्ता मिळवण्यासाठी कमीतकमी १ कंपनी मध्ये ६ महिने काम करणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड लिंक असलेलेच बँक खाते गृहीत धरले जाणार आहे याची विशेष नोंद असणे गरजेचे आहे.
- तुमचा UAN हा Biometric म्हणजेच Aadhar Face authentication पासून तयार करणे गरजेचे आहे.
नियोक्ता पात्रता (Eligibility)
संबंधित कंपनी देखील या योजनेमध्ये नोंदणी असणे अनिवार्य आहे. सरकारने सर्वच कंपन्यांना असे आदेश दिले आहेत.
ह्या योजनेत नोंदणी केल्यानंतर नवीन कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- UAN (EPFO)
- जॉईनिंग लेटर / रोजगार माहिती
- PAN (नियोक्ता)
विशेष सूचना:- संबंधित योजनेचा लाभ घेताना सरकारची EPFO ही अधिकृत वेबसाईट वापरूनच लाभ घ्यावा. अन्य कोणत्याही वेबसाईट किंवा लिंक्स ला बळी पडू नये.
थोडक्यात सांगायचं झालं तर, ही योजना म्हणजे सरकारकडून नोकरी मिळालेल्या नवीन युवकांना आणि नवीन कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक प्रोत्साहन देणारी रोजगार योजना आहे.


