RBI mandate to change a Bank domain

RBI mandate to change a Bank Domain. बँकांचे डोमेन होणार चेंज! नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना. काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर.  

RBI मार्गदर्शनानुसार RBI अंतर्गत येणाऱ्या सर्वच बँकांना त्यांचे ऑनलाईन डोमेन बदलावे लागणार आहेत. 

डिजिटल सुरक्षेसाठी आरबीआय चा हा निर्णय अतिशय महत्वाचा मानला जात आहे. 

यामध्ये प्रत्येक बँकेला डिजिटल स्थरावर एक वेगळी आणि सुरक्षित ओळख प्राप्त होणार आहे.

काय असेल Domain पात्रता?

आरबीआय अंतर्गत नोंदणीकृत सर्वच बँकांना आता त्यांचे मुख्य Domain बदलून थेट .bank.in या नवीन डोमेन वर वेबसाईट चे स्थलांतर करण्याचा सल्ला RBI ने दिला आहे.

त्यानुसार १ नोव्हेंबर पासून अनेक प्रसिद्ध बँकांनी त्यांचे डोमेन स्थलांतर केले आहेत.

कोणकोणत्या बँका .bank.in हे डोमेन खरेदी करू शकतात?

  • आरबीआय अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्वच बँका हे डोमेन खरेदी करू शकतात. हे डोमेन एक्सटेंशन सर्वांसाठी उपलब्ध नसणार आहे.
  • सायबर सेक्युरिटी मध्ये विशेष खबरदारी म्हणून हे महत्वाचे पाऊल RBI ने उचलले आहे. .com .in सारखे डोमेन सामान्य माणूस देखील खरेदी करू शकतो.
  • असे असले तरीही .bank.in हे डोमेन फक्त RBI रजिस्टर्ड बँकांना खरेदी करण्याची परवानगी असेल.

ग्राहकांना काय असेल फायदा?

  • गेल्या काही दिवसात Digital Fishing चे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे RBI ने हा निर्णय घेतला आहे.
  • ग्राहकांनी नेट बँकिंग व्यवहार करताना .bank.in हे डोमेन एक्सटेंशन असलेल्याच बँक वेबसाईट ला भेट देणे अनिवार्य आहे.
  • .bank.in या एक्सटेंशन मुळे तुम्हाला बँकेची खरी वेबसाईट ओळखण्यास मदत होणार आहे.

मुदत व अंबलबजावणी

३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व बँकांना हे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार १ नोव्हेंबर पासून बँकांच्या जुन्या वेबसाईट या डोमेन ला रिडायरेक्ट होतील किंवा बंद होतील.

टिप्पणी: इंटरनेट बँकिंग चा वापर करत असताना वर दिलेल्या माहितीप्रमाणे बँकेची खरी वेबसाईट पडताळणी करून मगच व्यवहाराला प्राधान्य द्या.

आरबीआय च्या या निर्णयाने डिजिटल बँकिंगच्या सुरक्षेत वाढ झाली आहे.

RBI चा हा निर्णय तुम्हाला कितपत योग्य वाटला ते कंमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा.

2 thoughts on “RBI mandate to change a Bank domain”

  1. Pingback: Namdev Vhatkar – Follower of Babasaheb

  2. Pingback: Property New Rules 2026 - मालमत्ता नवीन नियम २०२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top