Your Social Media Applications Will be Shutdown ?
Your Social Media Applications Will be shutdown? तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होत असलेल्या जलद घडामोडींमध्ये नुकतीच एक माहिती समोर आली आहे.
जिथे तुमचे सोसिअल मीडिया ऍप्लिकेशन्स बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे भानगड❓ चला जाणून घेऊयात सविस्तर.
केंद्रसरकारच्या नवीन नियमावलींनुसार काही सोसिअल मीडिया ऍप्लिकेशन्स फेब्रुवारी २०२६ पासून बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्य पडताळणी केली असता वास्तव काही वेगळे आहे.
खरंच बंद होणार ऍप्लिकेशन्स?
उत्तर नाही!
सरकारच्या नवीन नियमावलींनुसार तुम्हाला व्हॅट्सऍप, टेलिग्राम, आराताई, स्नॅपचॅट (WhatsApp, Telegram, Arattai Snapchat) सारखे अप्लिकेशन वापरण्यासाठी तुमच्या मोबाईल किवां डिजिटल यंत्रामध्ये सिम कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
ह्या पूर्वी आपण एकदा सिमकार्ड ने हे ऍप्लिकेशन्स नोंदणी केली आणि सिम काढून ठेवले तरीही हे ऍप्लिकेशन्स काम करत होते.
पण आता तसे होणार नाही. उलट नोंदणी केल्यानंतर जर तुम्ही सिमकार्ड त्या डिवाइस मधून काढले तर हे सर्व ऍप्लिकेशन्स बंद होणार आहेत.
या अगोदर हे नियम सर्व UPI ऍप्लिकेशन्स ना लागू होते, पण आता केंद्रसरकारने सोसिअल मीडिया साठी सुद्धा हे नियम लागू केले आहेत.
का लागू करण्यात आला नियम ?
लोकांची होत असलेली डिजिटल स्वरूपातील फसवणूक रोखणे हा यामागचा मुख्य हेतू सांगण्यात येत आहे.
या आधी सुरुवातीला म्हणजेच नोंदणी करताना एकदाच आपली परवानगी मागितली जात होती, त्यामुळे scammers साठी हि सुवर्ण संधी होती.
पण आताच्या पद्धतीनुसार दर ९० दिवसांनी सिमकार्ड तुमच्या डिवाइस मध्ये प्रत्यक्ष आहे कि नाही याची देखील पडताळणी सोसिअल मीडिया ऍप्सद्वारे होणार आहे.
जर SimCard, संबंधित Device मध्ये उपलब्ध नसेल तर तुमचे अप्लिकेशन बंद झालेच म्हणून समजा.
Web Platform वापरणाऱ्यांसाठी विशेष सूचना -
तुम्ही जर व्हाट्सअप वेब, टेलिग्राम वेब सारख्या सेवा वापरत असाल तर दर ६ तासांनी तुमचे वेब लॉगिन बंद होणार आहे, आणि तुम्हाला पुन्हा QR द्वारे लॉगिन करावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारकडून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल -
सरकारच्या म्हणण्यानुसार देशाबाहेरील सायबर हल्ले रोखण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्वाचा सांगितला जात आहे.
या आधी एकदाच वेरिफिकेशन होत असल्याने तुमची माहिती सहज चोरली किंवा अन्य प्रकारे वापरली जाण्याचा संभाव्य धोका अधिक होता.
यामुळे अश्या सेवा पुरवणाऱ्या सर्वच अप्लिकेशन कंपन्यांना हे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.
आणखी वाचा – Grokipedia will Compete with Wikipedia

